देश विदेश

नरेंद्र मोदींनी केला मोठा खुलासा!

भारताचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत-चीन वादावर गप्प का अशी अनेक प्रश्न भारतातील राजकीय क्षेत्रातील मोठ्या नेत्यांनी मीडियाशी बोलताना मांडली होती.आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेसमोर भारत-चीन वादावर खुलासा केला आहे.
चीनचं लष्कर भारताच्या हद्दीत घुसलेलं नाही, भारतीची कुठलीही पोस्ट किंचितही त्यांनी बळकावली नाही असा सर्वात मोठा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला.चीनचं लष्कर भारतीय हद्दीत घुसलं आहे. त्यांनी काही भारताच्या पोस्ट बळकावल्या आहेत असे आरोप होत होते. त्या सर्व आरोपांना पंतप्रधानांनी उत्तर सर्वपक्षीय बैठकीत उत्तर दिलं. भारताची एक इंच जमीन बळाविण्याचं धाडस कुणी करू शकत नाही असंही ते म्हणाले. देशाचं संरक्षण करण्यासाठी लष्कराला पूर्ण मोकळीक देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड