…या महिन्यामध्ये येणार कोरोनावर प्रभावी लस-W.H.O.
जगभरात कोरोना विषाणूने आपले थैमान घातले आहे.सर्व जग कोरोना विषाणूच्या महामारीमुळे त्रस्त असून कोरोना विरुद्ध दोन हात करून लढा देत आहे.दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे,कोरोना मुळे अनेक लोकांचे मृत्यु झाले आहेत.अशा भयाण परिस्थितीमध्ये सर्वांच्या मनाला सुखावणारा खुलासा डब्ल्यूएचओ केला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेतील (डब्ल्यूएचओ) मुख्य संशोधक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, या वर्षा अखेरीस म्हणजे डिसेंबर महिन्यापर्यंत कोरोना व्हायरसवर प्रभावी लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसवर उपचारासाठी प्रभावी लस तयार करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु आहे आणि लवकरच म्हणजे वर्षाच्या अखेरच्या महिन्यात कोरोनावर प्रभावी लस येईल. डब्ल्यूएचओ च्या या स्पष्टीकरण नंतर जागामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.