Popular News

अर्जुन तेंडुलकरनं दिली ‘या’ क्रिकेटपटूला धमकी!

क्रिकेट जगातले जवळपास सर्वच पराक्रम आपल्या नावे करून क्रिकेटचा देव झालेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरप्रमाणेच त्याचा मुलगा अर्जुनही कायम चर्चेत असतो. अर्जुन एक चांगला अष्टपैलू खेळाडू असून,अर्जुनाचा भारताच्या अंडर-19 संघामध्ये सहभाग होता.मात्र सध्या अर्जुन तेंडुलकर त्याच्या खेळामुळे नाही तर एक वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे. इंग्लंडची स्टार महिला क्रिकेटपटू डॅनिएल वॅट अर्जुननं आपल्याला धमकी दिल्याचं सांगितलं आहे. डॅनिएलनं एका वृत्तसंस्थेची बोलताना हा खुलासा केला.
अनेकदा इंग्लंडमध्ये अर्जुननं तिला गोलंदाजी केली आहे. तेव्हा अर्जुननं तिला बाऊन्सर आणि डोक्यावर चेंडू मारण्याचा इशारा दिला होता. मुख्य म्हणजे डॅनिएल आणि सचिनचा मुलगा अर्जुन खूप चांगले मित्र आहेत. मात्र डॅनिएल कायम अर्जुनच्या गोलंदाजीवर फलंदाजी करण्यास घाबरते.

– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड