महाराष्ट्र

…या कारणांमुळे वाढत आहेत कोरोनाबाधितांची संख्या-राजेश टोपे

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत आहे. राज्यात सर्वत्रच चिंता व्यक्त केली जात आहे.त्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या चिंताजनक वाढीच कारण स्पष्ट केले आहे.

लॉकडाऊन नंतर आता अनलॉकची प्रोसेस सुरू झाली आहे. त्यामुळे गर्दी वाढत आहे. मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे असं सांगितलं जात आहे. मात्र अनेकदा लोक हे नियम पाळत नाहीत. त्यामुळे बाधितांची संख्या वाढत असल्याची शक्यता आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. मात्र जे प्रतिबंधित विभाग आहेत त्याच ठिकाणी हे रुग्ण वाढत असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.
काळजी घ्या…गर्दी टाळा…स्वस्थ रहा…प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा!

– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड