महाराष्ट्र

…म्हणून मी मुख्यमंत्री झालो-उद्धव ठाकरे

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात शिवसेनेच्या नेत्यांसोबत भगवा ध्वज फडकवला. तसंच यावेळी शिवसैनिकांसोबत संवादही साधला. ”मला काहीजण म्हणतात की तुम्ही आल्यापासून एका मागोमाग वादळ येत आहे. पण शिवसेना एक वादळ आहे आणि शिवसैनिक हे कवच आहेत,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘अन्याय सहन करू नका आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. आपल्यासोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला तो आपण मोडीत काढला. त्यामुळे मी आज येथे मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला. ‘हिमालयाच्या मदतीला नेहमीच सह्याद्री धावून आला आहे.

– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड