महाराष्ट्र

बाळाच्या पोटावर दिले गरम विळ्याचे 100 चटके!

मानवी हृदयास चिरून जाईल असा अघोरी प्रकार समोर आला आहे.आजारी असलेल्या आठ महिन्यांच्या बाळाच्या पोटावर आई-वडिलांनीच गरम विळ्याचे चटके दिले आहेत. अंधश्रद्धेतून मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आई-वडिलांना बाळाच्या पोटावर विळ्याने शंभर चटके दिले. या प्रकारामुळे जिल्हात एकच खळबळ उडाली आहे.

श्याम सज्जु तोटा नाव असणाऱ्या या आठ महिन्यांच्या बाळाला आठ दिवसांपासून ताप,खोकला येत असल्याने आणि त्याचे पोट फुगत असल्याने या बाळाला दवाखान्यात न नेता आई-वडील 16 जून रोजी त्याला महिला मांत्रिकाकडे घेऊन गेले. आजारावर उपचार म्हणून तांत्रिकाने बाळाच्या पोटावर चटके देण्यास सांगितले. त्यानुसार आई-वडिलांना या तान्हुल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके दिले.
हा प्रकार समोर आल्यानंतर काटकुंभ इथलं भरारी पथक तसंच वैद्यकीय अधिकारी इथे पोहोचले. त्यांना बाळाला उपचारांसाठी चुरनी इथल्या ग्रामीण रुग्णालयात आणलं. सध्या त्या बालकावर उपचार सुरु आहेत. चिखलदरा पोलिसांनी मांत्रिक आणि बाळाच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील चिखलदरा तालुक्यामधल्या बोरदा या अतिदुर्गम आदिवासी गावात अघोरी प्रकार समोर आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड