बीड

सासुचा खुन!

अंबड (प्रतिनिधी)

सासू आणि जावई हे नातं आई-मुलासारखं असतं पण थोड्याश्या काही कारणाने ह्या नात्यात तणाव निर्माण होतो हेहि तितकेच खरं आहे.नात्यांमध्ये अति तणाव वाढला कि या तणावाचं रूपांतर भांडणामध्ये होतं आणि हे भांडण समाजामध्ये एका आरोपीला जन्म देतं. अशीच एक घटना अंबड शहरातील महाविर चौकाजवळ 26 ऑक्टोबर 2015 रोजी घडली होती.कृष्णा पवार या नावाच्या व्यक्तीने स्वतः च्या पत्नीसह सासु व मावस सासु यांना चाकूने वार केले असता, त्यामध्ये त्या व्यक्तीच्या सासु सुमन राठोड यांचा जागेवर मृत्यू झाला होता.

याप्रकरणी आरोपी कृष्णा पवार या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, अंबड तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. की त्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे सदर घटनेचा तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी केला असुन त्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड