महाराष्ट्र

राज्यात कोरोनाचं थैमान! आज आश्चर्यजनक रुग्णवाढ

देशात आणि राज्यात कोरोनाचं थैमान काही केल्या थांबेनास झाले आहे.दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णानाची संख्या वाढतच चालली आहे. राज्यात आज 3752 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.49 टक्के एवढा आहे. राज्यात आज 1672 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 60 हजार 838 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 53 हजार 901 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात 100 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. यासह आतापर्यंत 5751 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईत 67, भिवंडी 27, ठाणे 4, वसई विरार 1, नागपूर मनपा येथील एकाचा मृत्यू झाला आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…स्वस्थ रहा…प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा!

– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड