महाराष्ट्र

जीवन संघर्षला ते कंटाळले! एकाच दिवशी 3 आत्महत्या

सध्या सर्वत्रच आत्महत्येच्या बातम्या कानावर पडत आहेत.नैराश्या पुढे जीवन खरंच इतकं स्वस्त झाले आहे का?असा प्रश्न सर्वांच्या मनात घर करत आहे.पैसा,प्रसिद्दी असतानाही काही जण जीवनात नैराश्य आल्याने जीवन संघर्षांला कंटाळून माणसं जीवनयात्रा संपवत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज तीन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्यांच्या घटना समोर आल्या आहेत. वाकड येथे आयटी अभियंत्याने, काळेवाडीमध्ये विवाहित महिलेने तर रहाटणीत एका पुरुषाने जीवनयात्रा संपवली. विवाहित महिलेने राहत्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी घेतली तर इतर दोघांनी राहत्या घरात गळफास घेतला.
काळेवाडीच्या देल्वेरा सोसायटीत 33 वर्षीय कनिका शर्मा या चार वर्षीय मुलासोबत राहत होत्या. मूळच्या दिल्लीच्या कनिकाने आज दुपारी इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. तेव्हा त्यांचं मुल घरातच होतं. हा प्रकार सोसायटीमधील नागरिकांना मोठा धक्का देणारा होता. त्यांनी तातडीने वाकड पोलिसांच्या कानावर ही बाब टाकली. पोलिसांनी घटनास्थळ गाठलं, घरात छाननी केली. मोबाईलला लॉक असल्याने अधिकची माहिती प्राप्त होऊ शकली नाही. मुलं बोलण्याच्या मनस्थितीतही नाही. पती आणि कुटुंबीय दिल्लीत राहत असून ते पुण्याच्या दिशेने निघाले आहेत.ते इथं पोहचल्यानंतर अधिकची माहिती प्राप्त होणार आहे.

– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड