Popular News

…या चुकांमुळे सोशल डिस्टेंसिंग आणि मास्क लावून काहीही उपयोग होणार नाही!

कोरोनाच्या माहामारीमुळे सर्वत्र नैराश्याचे वातावरण पसरले आहे. कोरोना व्हायरसच्या वेगाने होत असलेल्या संक्रमणामुळे लोकांचे आयुष्य खूपच बदलून गेले आहे. लोक या जीवघेण्या व्हायरसपासून बचावासाठी सावधगिरी बाळगत आहेत. तसंच काही लोक चुकाही करत आहेत. या चुकांमुळे सोशल डिस्टेंसिंग आणि मास्क लावून काहीही उपयोग होणार नाही. कारण वेगवेगळ्या मार्गातून संक्रमणाचा धोका वाढत आहे

  • काही लोक नाकाच्या खाली मास्क लावतात. त्यामुळे नाकाद्वारे संक्रमण पसरण्याचा धोका असतो. म्हणून  तोंड ,नाक झाकलं जाईल अशा पद्धतीने मास्क लावा. 
  • काही लोक गरजेपेक्षा जास्त सॅनिटायजरचा वापर करतात.जेव्हा तुमच्याकडे पाणी आणि साबणाची उपलब्धता असते. तेव्हा सॅनिटायझरचा वापर करण्याची काहीही आवश्यकता नाही.
  • मास्क लावल्यानंतर मास्कला पुन्हा हातांचा स्पर्श करणे टाळा.मास्क काढून खिशात अथवा इतरत ठिकाणी खाली ठेवल्यास पुन्हा मास्क तोंडाला लावू नका.
  • नेहमी बाहेरून कोणतंही सामान आणल्यानंतर डिइंफेक्टंट स्पेच्या मदतीने शिंपडा. त्यानंतर सामानाचा वापर करा. भाज्या आणि फळांना डिइंफेक्टंट वापरण्यापेक्षा गरम पाण्याने स्वच्छ धुवून मगच वापर करा. जेणेकरून  वस्तूंमार्फत संक्रमण पसरणार नाही. 

  • “लक्षात ठेवा कोरोनावर अजून कुठलाही उपचार नाही कोरोनावर खबरदारी हा एकमेव उपचार आहे”
    काळजी घ्या…गर्दी टाळा…स्वस्थ रहा…प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा!
    – दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड