सलग १२ व्या दिवशी इंधन दरवाढ;वाचा आजचे दर किती?
सध्या देशात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे.अशातच लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या काळात सामान्य लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये गुरुवारी सलग 12 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोल 6.55 रुपयांनी महागलं आणि डिझेलची किंमत 7.06 रुपये प्रति लीटरने वाढली आहे.
तेल कंपन्यांनी गुरुवारी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमतीत 53 पैसे आणि डिझेलमध्ये 64 पैशांची वाढ केली आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत वाढून क्रमशः 77.81 रुपये आणि डिझेलची किंमत वाढून 76.43 रुपये प्रति लीटर एवढी झाली आहे.
– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड