महाराष्ट्र

…तरीही गणेश उत्सव साजरा होणार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

18 जून: राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना प्रादुर्भावामुळे यंदाचा गणेशोत्सवावर कोरोना विषाणूचं सावट आहे. अवघ्या दोन महिन्यावर गणेश उस्तव येऊन ठेपला आहे.राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना प्रादुर्भावामुळे अवघ्या दोन महिन्यावर गणेश उस्तव येऊन ठेपला आहे.या दिवसांमध्येच लाडक्या गणरायाचे जोरदार आगमन करण्याकरीता राज्यातील प्रत्येक मराठी माणूस सज्ज असतो.याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विशेष आवाहन केलं आहे.आगामी गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात गुरुवारी मंत्रालय येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यंदाचा गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचं नवा आदर्श निर्माण करावा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केलं आहे.आगामी गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात गुरुवारी मंत्रालय येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.