बीड

कोरोनाचा कहर! आणखी एक मृत्यु

बीड :
परळी शहरातील एक 57 वर्षीय महिला किडनीचा आजार असल्याने उपचारासाठी औरंगाबाद गेल्यावर 5 जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आली होती.तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.तिला किडनीच्या आजारासह मधुमेह, हाइपरटेंशन, न्यूमोनिया अशी अनेक आजारही होते. बुधवारी तिला रुग्णालयातून सुटी देण्यात येणार होती. परंतू डायलेसीस करायचे असल्याने ठेवण्यात आले होते. गुरूवारी पहाटे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.आरोग्य विभागाच्या अनेक प्रयत्नानंतरही अखेर कोरोना विषाणूने या महिलांचा जीव घेतला.कोरोनाच्या प्रादुर्भाव पासून वाचण्याकरिता खबरदारी हा एकमेव उपाय आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…स्वस्थ रहा…प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा!
– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड