आज दिलासा!मात्र निष्काळजीपणा मुळे बीड वर मोठं संकट
बीड.-(दि.18 ) बीड जिल्ह्यातुन आज तपासणीकरिता पाठवण्यात आलेली 36 स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आला असल्याने आज बीड जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. मात्र कोरोना विषाणू बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस आपले हात-पाय पसरू लागला आहे हे देखील तितकेच खरं आहे.
बीड जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्या पासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व दुकान,व्यवसाय,सुरु असल्याने बीड जिल्ह्यात सर्वत्र गर्दी होत आहे आणि या गर्दी मध्ये सोशल डिस्टन्स पाळल्या जात नाहीए,काही निष्काळजी माणसं मास्क न वापरता गर्दी मध्ये सर्वत्र वावरत आहे, तर काही माथेफिरू माणसं गर्दी मध्ये,सार्वजनिक ठिकाणी,रस्त्यावर तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करून थुंकताना पण आढळत आहेत.नक्कीच या बेजवाबदार वागण्याने कोरोनाच्या वाढत्या संक्रमणास नकळत आमंत्रण मिळते आहे. या बेजवाबदार वागण्याने बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नक्कीच वाढेल. आणि बीड जिल्ह्याला येणाऱ्या काळात मोठ्या संकटचा सामना करावा लागेल.येणाऱ्या काळात या मोठ्या संकटातून वाचण्यासाठी प्रत्येकाने सोशल डिस्टन्स ठेवत मास्क वापरणे अत्यावश्यक आहे.मास्क हा सध्या मानवी आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे हे विसरून चालणार नाही.गर्दी मध्ये,सार्वजनिक ठिकाणी,रस्त्यावर थुंकणाऱ्यांनी रस्त्यावर थुंकणे थांबवलेच पाहिजे.प्रशासनाच्या सूचनेचे पालन करणे अत्यावश्यक आहे अन्यथा बीड वर कोरोनारुपी नकळत मोठे संकट उभे राहतंय हे विसरून चालणार नाही.
काळजी घ्या…गर्दी टाळा…स्वस्थ रहा…प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा!
– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड
तुम्हाला माहितीये की सर्व लोक तंबाखूजन्य पदार्थ खातात तुम्ही तरी मीडिया आहेत तुम्ही या गोष्टी समोर का आणत नाहीत.सिस्टिमला धारेवरसिस्टिमला धारेवर धरले पाहिजे ना? खरं नसतं पेपर मध्ये लिहून पाठवायचे बीड जिल्ह्याचा असं झालं तसं झालं