राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाची समिती बरखास्त
आष्टी (प्रतिनिधी)महिला आर्थिक विकास महामंडळ मधून चित्रा वाघ यांच्याबरोबरच दर्शना महाडिक (रत्नागिरी), विणा तेलंग (नागपूर), शलाका साळवी (मुंबई), रितू तावडे (मुंबई), चंद्रकांता सोनकांबळे (पिंपरी, पुणे), मिनाक्षी पाटील (लातूर), साधना सुरडकर (औरंगाबाद), उमा रामशेट्टी (परळी, बीड), शैलजा गर्जे (आष्टी, बीड), अर्चना डेहनकर (नागपूर) या सदस्यांची नियुक्ती राज्य शासनाने आदेश काढून रद्द केली आहे. आता हे नवीन सरकार या जागा भऱणार आहे.चित्रा वाघ यांच्या जागेवर कोणाला संधी मिळणार हे आता पहावे लागणार आहे. तत्पुर्वी हे महामंडळ महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला जाणार हे अजून ठरायचे आहे त्यानंतर कोणत्या महिला नेत्यांना संधी आहे ते स्पष्ट होणार आहे.
-दैनिक झुंजारनेता लाईव्ह,बीड