बीड

अल्पवयीन मुलीवर अत्याचार;आरोपी अटकेत

केज दि.१७ ( प्रतिनिधी )  केज तालुक्यातील एका गावात एक अल्पवयीन मुलगी एकटीच असल्याचे पाहून शेतात मजुरीसाठी आलेल्या एकाने तिला धमकी देऊन सात महिन्यापुर्वी अत्याचार केला. हा प्रकार मुलीला दवाखान्यात घेऊन गेल्यावर तपासणी केल्यानंतर उघडकीस आला आहे.मात्र मुलीला दिलेल्या धमकीमुळे याबाबत तिने या झालेल्या प्रकाराची माहिती सांगितली नाही. हा प्रकार उघडकीस येताच अत्याचारीत मुलीने मंगळवारी१६रोजी पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील एका गावातील बाजरी काढण्याच्या कामासाठी आलेल्या एकाने गावापासून डोंगरी भागात परिसरात साधारणतः दीड किमी असलेल्या शेतात अल्पवयीन मुलगी एकटीच असल्याचे पाहून लैंगिक अत्याचार केले.याबाबत कोणाला सांगितलेस तर बघ अशी धमकी दिली.ही घटना मागील सहा महिन्यापुर्वी घडली होती; परंतू धमकी दिल्याने मुलीने याची कोणालाही माहिती दिली नाही.दोन-तीन दिवसांपूर्वी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेल्यावर तपासणी केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे सांगण्यात आले.याबाबत वडीलांनी विचारले असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला.अत्याचारीत मुलीने पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून सतिश सखाराम सरवदे वय-२२ याच्या विरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेखा धस या करीत आहेत.