कहर!आरोग्यमंत्रीही कोरोनाच्या विळख्यात
17 जून : महाराष्ट्रापाठोपाठ राजधानी दिल्लीत कोरोनाचं थैमान आता सुरू झालं आहे. गेल्या 15 दिवसात अतिशय वेगाने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दिल्लीचा मृत्यूदरही वाढत असल्याने काळजी वाढत आहे. त्यातच आणखी चिंता वाढवणारी बातमी आली आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं वृत्त आहे.
दिल्लीच्या आरोग्य खात्यानेच याविषयी बातमी दिली आहे. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना दोन दिवस लक्षणं जाणवत होती. ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना राजीव गांधी सुपर स्पेशलियटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सुरुवातीला चाचणी निगेटिव्ह आली पण रुग्णालयात केलेली दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.