बीड

धक्कादायक! आज 5 पॉझिटिव्ह

बीड.-(दि.17 ) बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू दिवसेंदिवस आपले हात-पाय पसरू लागला आहे.त्यामुळे बीड जिल्ह्यात सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.आज सकाळी पाठवण्यात आलेल्या ५७ संशयितांच्या स्वॅब पैकी ५ स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत.माळेगाव येथील 4 रुग्ण तर बीड मधील 1 रुग्ण असल्याची माहिती आरोग्य सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

केज मधील मयत महिलेच्या संपर्कातील नातेवाईकांचे 28 स्वॅब घेण्यात आले होते. या सर्वामुळे केजसह जिल्हा वासियांची चिंता वाढलेली होती. महिलेच्या संपर्कातील माळेगाव (ता.केज) येथील 4 पॉझिटिव्ह आले आहेत. यात 36 वर्षीय महिला, 60 आणि 38 वर्षीय दोन पुरुष व 12 वर्षीय बालकाचा समावेश आहे. तर बीडमधील मसरत नगरमधील कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कातील हिना नगर येथील आणखी एक जण पॉझिटिव्ह आला असून तो 52 वर्षीय पुरुष आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय -6 स्वॅब,
सी.सी.सी.बीड 7 स्वॅब,
अंबेजोगाई 2 स्वॅब,
उपजिल्हा रुग्णालय गेवराई 2 स्वॅब,
ग्रामीण रुग्णालय आष्टी 7 स्वॅब,
उपजिल्हा रुग्णालय केज 28 स्वॅब,
उपजिल्हा रुग्णालय परळी 7 स्वॅब,
अशी एकूण 57 संशयितांची स्वॅब तपासणीकरिता पाठवण्यात आली होती. या 57 स्वॅबचा अहवाल आला असून एकूण 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…स्वस्थ रहा…प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा!
– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड

One thought on “धक्कादायक! आज 5 पॉझिटिव्ह

  • संपुर्ण न्युज द्या
    बरे किती झाले? उपचार किती लोकांवर सुरू आहे?
    क्वारटाईन किती आहेत?

Comments are closed.