Popular News

सुशांत सिंह राजपूतबाबत कमाल खान करणार मोठा गौप्यस्फोट!

17 जून: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं रविवारी (15 जून) आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. त्याच्या अचानक एक्झिटमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मात्र, यासोबतच बॉलिवूड पुन्हा एकदा घराणेशाहीचा वाद उफाळून आला आहे. सोशल मीडियावर करण जोहर, सलमान खान सारख्या सेलिब्रेटींना सुशांतच्या आत्महत्येला जबाबदार धरत ट्रोल केलं जात असताना कमाल खान उर्फ केकेआर यांन एक धक्कादायक ट्वीट केलं आहे. सुशांत सिंह राजपूतबाबत एक व्हिडीओ शेअर करून आपण मोठा मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं कमाल खान यानं म्हटलं आहे.

– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड