कळंब-रोटरी क्लब सिटीचा स्तुत्य उपक्रम!
कळंब:/ रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी मार्फत कळंब शहरामध्ये आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या रोगप्रतिकार शक्ती वर्धक आर्सेनिक अल्बम -३० या गोळ्यांचे वाटप साई नगर ,द्वारका नगरभागात वाटप करण्यात आली आहे. याची सुरुवात पुनर्वसन सावरगाव या भागापासून करण्यात आली. रोटरी क्लब चे सचिव डॉ. प्रा. चौधरी, रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी चे नूतन अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी व नूतन सचिव डॉ. सचिन पवार हे उपस्थित होते.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक जाणिवेतून नूतन अध्यक्ष डॉ. गिरीष कुलकर्णी व नूतन सचिव डॉ. सचिन पवार यांनी सुमारे २०,००० लोकांना पुरतील अशा ५००० गोळ्या च्या बॉटल देण्याचे ठरवले यासाठी रोटरीतील तज्ञ डॉक्टरांची टीम तयार करून व सर्व रोटरी क्लबचे सदस्य यांच्या मदतीने वाटपाची सुरुवात केली . या प्रोजेक्ट चे प्रोजेक्ट चेअरमन म्हणून डॉ. निळकंठ चोपणे हे काम पाहत आहेत.
या गोळ्या वाटप करत असताना स्वतः सर्व रोटरी सदस्य घरोघरी जाऊन घरातील लोकांची संख्या विचारुन त्या पद्धतीने त्यांना गोळ्या वाटप करून त्या कशा घ्यावयाच्या व औषधी घेताना काय पथ्य पाळावीत याची माहिती सांगून एक माहितीपत्रक देत आहेत व या गोळ्या कमीत कमी 3 डोस घेण्याचे आवाहन करत आहेत.