बीड

नांदेड- एका आमदारासह 70 जण क्वारंटाईन!

नांदेड ( प्रतिनिधी ) नांदेड जिल्ह्यातील एका आमदारासह ७० व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले असून , हे सर्वजण एका अंत्यविधीस गेले असल्याने व त्यातील १३ जन पॉझिटिव्ह आढळल्याने, संपर्कातील अनेकांना क्वारंटाईन होण्याची वेळ आली असून त्यांच्या अहवालाकडे सर्वांची प्रतीक्षा लागली आहे. 

अंत्यविधीला गेलेले मुखेड येथील १३ जण पॉझिटिव्ह आढळल्याने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आमदारांसह अनेक लोकांना क्वारंटाईन होण्याची वेळ आली असून काही संशयितांचा अहवाल अद्याप अनिर्णित असल्याने त्यांच्या अहवालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मागील आठवड्यात मुखेडच्या एकाच कुटुंबातील 2 जण बाधित असल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील शंभराहून अधिक जणांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते.  त्यानंतर ५ आणि नंतर ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.  यात मुखेड येथील राजकीय पक्षाच्या एका डॉक्टर आणि व्यापाराचा समावेश होता.

हे सर्वजण मुखेड येथील एका अंत्यविधीसाठी गेले होते. आता या १३ जणांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वॅब घेणे सुरू झाले असून, ५४ आणि २५ जणांचे स्वॅब वेगवेगळ्या टप्प्यात तपासण्यासाठी पाठविल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील एका आमदाराचा स्वॅबदेखील तपासणीसाठी घेतला असता त्यांच्यासह मुखेड येथील बऱ्याच राजकीय मंडळींना क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. मुखेड येथील ८० स्वॅब नमुने प्रलंबित असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

-दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड