बीड

किल्लेधारूर महाविद्यालय ऑनलाइन आंतरराष्ट्रीय वेबीनार संपन्न

किल्लेधारुर दि.१७(प्रतिनिधी) येथील मराठवाड़ा शिक्षण प्रसारक मंडल संचलित, कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे आज दिनांक १७ जून रोजी “माध्यम, भाषा आणि साहित्याची सामग्री  वर्धन आणि उपयुक्तता ” या विषयांवर अंतर्गत गुणवत्ता मूल्यमापन विभाग व मराठी, हिंदी आणि इंग्रजी विभागा द्वारे आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय ऑनलाइन वेबीनार संपन्न झाले.
 मराठवाड़ा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  आमदार प्रकाशदादा सोळंके, सचिव आमदार सतीशभाऊ चव्हाण (पदवीधर आमदार, मराठवाडा विभाग) तसेच कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किल्ले धारूर येथील महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख जयसिंग भैय्या सोळंके तसेच लोभाजी चव्हाण (सदस्य, महाविद्यालय विकास समिती), अजय सिंह दिख्खत (सदस्य, महाविद्यालय विकास समिती), डॉ. राम शिनगारे (सदस्य, महाविद्यालय विकास समिती), मुकुंद सावंत (सदस्य, महाविद्यालय विकास समिती), इंद्रजित जाधव (सदस्य, महाविद्यालय विकास समिती), प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ, उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे यांच्या शुभेच्छांनी या वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ हे या आंतरराष्ट्रीय वेबिनार कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. नेपाळ येथील डॉ. हाेम राज खडका यांनी बीज भाषक म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी येऊ घातलेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धती मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर मार्गदर्शन केले. तर दुसरे वक्ते डॉ. विनोद कुमरे (मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई) यांनी मराठी भाषेचा मिडियावर होणारा परिणाम व आधुनिक मिडियामध्ये होत चाललेल्या बदलांवर भाष्य केले. तिसऱ्या सत्रात डॉ. महेंद्र ठाकूरदास (माजी विभागप्रमुख, हिंदी विभाग, किल्लेधारूर) यांनी लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक मूल्यावर आधारित शिक्षण पद्धती हवी असल्याचे मत मांडले. विविध संदर्भ देऊन त्यांनी मार्गदर्शन केले. तर चौथ्या सत्रात डॉ.के. वेंकट सतीश (इंग्रजी विभाग, आयआयटी, श्रीकाकुलम, आंध्र प्रदेश) यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ऑनलाइन शिक्षण पद्धतीमध्ये अत्यावश्यक असल्याचे मत मांडले. पाचव्या सत्रात डॉ. वैजनाथ अनमोलवाड (मराठी विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड) यांनी माध्यमांमध्ये मराठी भाषा व उपयुक्तता या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. त्यांनी भाषेचा इतिहास व माध्यमांमध्ये वापरली जाणारी भाषा या विषयावर आपले मत व्यक्त केले. त्यानंतर सहाव्या सत्रात डॉ. अशोक जाधव (नांदेड) यांनी हिंदी साहित्यामध्ये माध्यमांची भूमिका या विषयावर आपले मत मांडले. या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनार मध्ये विविध महाविद्यालयातील विविध राज्यातील ७४४  प्राध्यापक व संशोधकांनी आपला सहयाेग नोंदवला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ, उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. दिगंबर गंजेवार, तसेच ग्रंथपाल जी.डी. सगर, हिंदी विभाग प्रमुख, प्रा. विनायक कापावार, डॉ. नितीन कुंभार आदी यावेळी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. दिगंबर गंजेवार यांनी मानले.

दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड