घाटनांदूर सह परिसरात पेरणीला सुरुवात
घाटनांदूर,:-दि१७,(प्रतिनिधी) अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर सह परिसरात वरुनराजाचे दमदार आगमन झाले असून मागील चार ते पाच वर्ष्याची दुष्काळी पार्श्वभूमी पहाता या वर्षी वरुनराजाचे अगदी वेळेत व दमदार आगमन झाल्यामुळे बळीराजाने पेरणीची लगभग सुरू केली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शेतकऱ्यांनी पेरणीची लगभग सुरू केली असली तरी कृषी केंद्र चालकाकडून जादा दराने खत व बी बियाणे विक्री केली जात असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत.डीयपी खताला मागणी जास्त असल्याचे दिसून येते.तर हेच डियपी खत जादा दराने विक्री केली जात आहे.आधीच विविध कर्जाच्या बोजा खाली तसेच खासगी सावकारांचे उंबरठे झिजवणारा शेतकरी पुरता मेटाकुटीला आल्याचे दिसून येते. मागील चार ते पाच वर्षयाची दुष्काळी पार्श्वभूमी पहाता शेतकऱयांची लूट थाबवणे गरजेचे आहे.घाटनांदूर व परिसरात सोयाबीन उडीद मूग व तूर पिकांचा पेरा क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते.यावर्षी वरुणराजा अगदी वेळेत पोहचला असून त्यामुळे शेतकऱ्यां मधून समाधान व्यक्त होताना दिसून येत आहे.