बीड

गेवराई-मयत पोलिसांच्या कुंटूबातील लोकांना आर्थिक मदत

गेवराई , दि.१७ (कैलास हादगुले):- पोलीस ठाणे गेवराई आणि बीड येथे कर्तव्य पार पाडत असताना आजारपणात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निधन झाले होते.या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या परिवारास बीड जिल्ह्यातील पोलीस मित्र मंडळाच्या वतीने १ लाख ७७ हजार ६०० रूपये मदत करण्यात आली.     

 गेवराई पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक औदुंबर दहिफळे वय ४५ वर्षे हे आजारी होते,बीड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे एप्रिल महिन्यात निधन झाले होते.तर बीड पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेले रामेश्वर केशवराव खेडकर रा.तिंतरवणी यांचेही आजारपणात निधन झाले होते.दरम्यान या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या परिवारास बीड जिल्ह्यातील  पोलीस मित्र मंडळाच्या वतीने प्रत्येकी ८८ हजार ८०० रूपये अशी १ लाख ७७ हजार ६०० रूपये मदत करण्यात आली.पोलीस मित्र मंडळाचे परमेश्वर सानप,राजेंद्र गर्जे,दिलिप गिते,सुरेश सांगळे,बाबासाहेब दराडे,राजेंद्र सांगळे,सचिन जायभाये,विकास वाघमारे,दिलिप कुहारे  यांनी सदरील मदत मयताच्या परिवारास सुपूर्द केली.

– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड

(कैलास हादगुले)