बीड

तीन लाख रुपये किंमतीचा डंपर व १५ हजार रुपयांची वाळू जप्त

आष्टी (प्रतिनिधी)अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणारा वाळूचा डंपर आष्टी येथील डीवायएसपी यांच्या पथकाने जप्त केला.आष्टी तालुक्यातील पाटणसांगवी येथे शनिवारी दि.१३ जुन ही कारवाई करण्यात आली. याबाबत डंपर चालक शंकर पवार (वय २२ रा.शिदेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलिस शिपाई संतोष सोनवणे (वय ३२) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली.सोनवणे हे अंभोरा येथे कार्यरत आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या आयबाईक पथकात आहेत. उपविभागौय पोलिस अधिकारी विजय लगारे यांच्यासमवेत सहायक फौजदार नंदकुमार ठोंबरे, पोलिस शिपाई शिनगारे हे जिल्हा गस्त पेट्रोलिंग ड्युटी करीत आढळली.ही वाळू अवैधरित्या हिंगणी येथील सीना नदीच्या पात्रातून आणून पाटणसांगवी येथे टाकायची होती असे चालकाने सांगितले त्यावरून तीन लाख रुपये किंमतीचा डंपर व १५ हजार रुपयांची वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.वाहनचालकावर अवैध वाळू उपसा व संचारबंदीत वाहतूक केल्याने साथरोग प्रतिबंधक कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.