बीड

लिंबागणेश- जवळ अपघात 2 शेतकर्‍यांचा मृत्यू. 1 जण गंभीर जखमी

नेकनुर दि 15 (प्रतिनिधी ) बियाणे घेऊन दुचाकी वरुन घरी परत येत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिल्याने दुचाकी वरील स्वार दोन शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर झाला आहे. जखमी ईस्माला दवाखान्यात दाखल करण्यात आले असून कार चालकास ताब्यात घेण्यात आले आहे अशी माहिती पोलीसाकडुन मिळाली आहे.

अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावे बंकट बाबु मोरे वय 50 वर्षे संजय बाळु सोनवणे वय 45 वर्षे तर जखमी गोरख बबन मोरे वय 32 वर्षे सर्व रा. मसेवाडी ता. बीड जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश येथे उपचार सुरू आहे.
हे तिघे मोटारसायकल क्रमांक एमएच 23 एस 8146 वरुन लिंबागणेश येथुन बियाणे घेऊन मसेवाडी कडे परत येत होते यावेळी लिंबागणेश परिसरात मुळुक चौकात समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या कार क्रमांक एमएच 12 जे. झेड.6727 ने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने यातील दोघे जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे त्यावर उपचार सुरू आहेत. निश्काळजी पनाने गाडी चालवुन दोघे जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कार चालकास ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती जमादार राऊत यांनी दिली आहे. अपघातात दोघे ठार झाल्याने मसेवाडी गावात शोककळा पसरली आहे.
– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड