News

डीपीला चिकटून बैलाचा मृत्यू


कडा ( वार्ताहर ):- शेतात काम करीत असताना डीपीला चिकटून एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना आष्टी तालुक्यातील देवीनिमगांव येथे घडली.    याबाबत अधिक माहिती अशी की, मृगाचा पाऊस सुरू झाल्याने शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. देविनिमगांव येथील अशोक वाळके  यांचा बैल डीपीला चिटकुन मरण पावला, त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन पेरणीच्या कालावधीतच एक बैल गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे.