टाटा सूमो आणि स्विफ्टचा अपघातात एक जण जागीच ठार तीन जण जखमी
शिरूर- रायमोह ते शिरूर रस्त्यावर रविवारी (ता.१४) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास टाटा सूमो आणि स्विफ्टचा अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.
रायमोह ते शिरूर रस्त्यावर तागडगाव फाट्याजवळ आज रात्री ८.३० दरम्यान टाटा सूमो आणि स्विफ्टची धड़क होऊन जबर अपघात झाला. या अपघातात लोणी येथील शाळेवर कार्यरत असणारे मात्र, सध्या बीड येथील प्रगती विद्यालयात डेपोटेशनवर असणारे प्रशांत डी.कुलकर्णी हे शिक्षक जागीच ठार झाले आहेत. तर तीन जन जबर जखमी झाले आहेत.
जखमींची नावे समजली नाहीत.जखमींना शिरूर पोलीस ठाण्याचे जमादार अशोक शेळके यानी घटनास्थळी तात्काळ जाऊन जखमींना बीड येथील रुग्णालयात हलवले आणि पाटोदा पोलिसांना माहिती दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रायमोहा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.