नागेश देशपांडे (गुरूजी )यांचे निधन
शिरुरकासार येथील रहीवासी सेवानिवृत्त शिक्षक नागेश देशपांडे यांचे त्यांच्या पुणे(वाघुली) येथील राहत्या घरी रविवार दि १४ रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले.ते ८२ वर्ष वयाचे होते.तालुक्यातील वारणी येथील मूळ रहिवासी असलेले देशपांडे गुरूजी (तात्या) या नावाने परिचित होते.शिरुरकासार येथील माध्यमिक शाळेत त्यांचा बहुतांश कार्यकाळ शिक्षक या पदावर गेला ते सेवानिवृत्त झाल्यानंतर येथेच स्थाईक झाले त्यांचे अनेक विद्यार्थी चांगल्या पदावर कार्यरत आहेत. आदर्श शिक्षक म्हणून तालुक्यात त्यांची ओळख होती रविवार दि १४ रोजी सायंकाळी आठ वाजता वाघोली (पुणे) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती शालिनी नागेश देशपांडे (सेवानिवृत्त शिक्षीका) मुलगा डॉ गणेश व विवाहित तीन मुली आणि एक सुन डॉ अर्चना गणेश देशपांडे ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.