आष्टी-खडकत चेक पोस्टवर जनावरांची सुटका
आष्टी (प्रतिनिधी)
ओरडू नये व हालचाल करू नये म्हणून पाय व मुंडके सुतळीने गच्च बांधून पिकअप टेम्पोत दाटीवाटीने कोंबलेल्या अवस्थेत कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ वासरांची आष्टी पोलिसांनी खडकत चेक पोस्टवर सुटका केली.याबाबत पिकअप चालक आफताफ पठाण (वय २१, रा. खडकत) यांच्यावर आष्टी पोलिसांत
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची फिर्याद होमगार्ड आकाश साळवे (वय २०)यांनी दिली. कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर साळवे हे मागील दोन महिन्यांपासून खडकत चेकपोस्ट येथे नेमणुकीस आहेत.१० जूनला सकाळी नऊच्या सुमारास साळवे यांच्यासह होमगाड अशोक हंबर्डे, होमगार्ड राहुल मोहिते हे वाहनांची तपासणी करीत असताना त्यांना पिकअप (एमएच-२३,एयू ९८२५) संशयास्पद वाटला.तपासणो केली असता आत अंदाजे दोन महिने वयाची गोवंश वासरे दाटोवाटीने बांधल्याचे दिसून आली.आष्टी पोलिस ठाण्याला माहिती देताच पोलिस नाईक आटोळे,पोलिस शिपाई पठाण हे आले. वासरे भरलेला पिकअप चालकासह आष्टी पोलिस ठाण्यात आणून पंचनामा करण्यात आला.दोन लाख रुपये किंमतीचा पिकअप व २८ हजार रुपयांची वासरे असा दोन लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
-दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड