बीड

बीड-136 पैकी 136 स्वॅब निगेटिव्ह!

बीड : बीड जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे बीड जिल्हावासी भयंकर चिंतेत आहेत. आणि आज बीड जिल्ह्यातून 136 संशयित व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठवल्या नंतर बीड जिल्ह्यामध्ये आणखी जास्तच चिंता वाढली आहे.पण आज जिल्ह्यातून स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल आलेला असून 136 पैकी 136 स्वॅब निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या कडून प्राप्त झाली आहे.

काळजी घ्या…गर्दी टाळा…स्वस्थ रहा…प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा!
– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड