News

बीड : धक्कादायक! 4 कोरोनाबाधित रुग्णांवर गुन्हा दाखल

बीड, 14 जून: होम क्वारंटाईनचे आदेश झुगारून बाहेर फिरणे आठ जणांना चांगलंच महागात पडलं आहे. बीड शहर पोलिलांना त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर गुन्हा दाखल होण्याची बीड जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.