News

धक्कादायक! अभिनेता सुशांत सिंग राजपुतने केली आत्महत्या, राहत्या घरात लावला गळफास

मुंबई- प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं कारण समोर आलं नसून यासंबंधी पोलीस तपास करत आहेत. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक टीव्ही अभिनेता म्हणून केली.

सुशांतने ‘किस देश में है मेरा दिल’ मालिकेत पहिल्यांदा काम केलं. मात्र त्याला खरी ओळख एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून मिळाली. यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. काय पो छे हा सुशांतचा पहिला सिनेमा होता. पहिल्याच सिनेमातील अभिनयाबद्दल त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं होतं.