News

बीड जिल्ह्यातून रविवारी 136 स्वॅब तपासणीला

बीड जिल्ह्यात रविवारी 136 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले आहेत. यात जिल्हा सामान्य रुग्णालयातून 49, सीसीसी बीडमधून 23, स्वाराती अंबाजोगाईतून 18, सीसीसी अंबाजोगाई 11, केज 1, आष्टी 2, गेवराई 4 आणि परळीतून 28 असे एकुण 136 स्वॅब पाठवण्यात आले आहेत. त्यात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत.