महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या म्हणजे रविवार 14 जून रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहेत. रायडगडमधील चौल, बोर्ली, मुरुड येथे निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना त्यांच्या हस्ते मदत साहित्य आणि अनुदान वाटप केले जाणार आहे. सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री मांडवा जेट्टी येथे पोहचतील. त्यानंतर चौल येथे जाऊन ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली.

सकाळी 11 वाजता चौल मधील घरे, पिके नुकसानीची पाहणी करून नंतर त्यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान, सौर कंदील, इतर साहित्याचे वाटप करण्यात येईल. दुपारी 12 वाजता त्यांचे बोर्ली येथे आणि 12.30 वाजता मुरुड येथे आगमन होईल. दोन्ही ठिकाणी नुकसानीची पाहणी आणि मदत वाटप करण्यात येईल. मुरुड येथे त्यांची पत्रकार परिषद देखील होईल. दुपारी 3 वाजता मांडवा जेट्टी येथून बोटीने ते मुंबईकडे रवाना होतील.