महाराष्ट्र

उस्मानाबाद- 2 रुग्णालय 24 तासांसाठी बंद!

उ स्मानाबाद शहरातील बोंबले हनुमान रोड भागातील 8 महिन्याची गरोदर महिला कोरोनाग्रस्त सापडल्याने खळबळ उडाली असून या महिलेच्या संपर्कातील सर्व ६१ व्यक्तींना कवारनटाईन करण्यात आले आहे. बोंबले हनुमान रोड, वासुदेव वस्तीसह शेजारील भाग रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून तो तात्काळ सील करण्यात आला आहे तर महिला ज्या ४ रुग्णालयात उपचारासाठी गेली होती त्या भागासह येडशी गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. सह्याद्री मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात ही महिला उपचारासाठी काही दिवस दाखल असल्याने या रुग्णालयातील डॉक्टर व स्टाफसह २५ जणांचे स्वॅब घेण्यात येणार असून त्यांना कवारनटाईन करण्यात आले आहे असल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी रामेश्वर रोडगे यांनी दिली. स्वामी हॉस्पिटल मधील २ जण संपर्कात आले असून डंबळ यांचे निरामय रुग्णालय निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे तर डॉ दापके यांच्या सह्याद्री मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासह स्वामी हॉस्पिटल ही २ रुग्णालये २४ तासांसाठी बंद करण्यात आली आहेत.

       काळजी घ्या...गर्दी टाळा...स्वस्थ रहा...प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा!
                    -दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड