बीड

वडवणी-वकील बांधवांना किराणा किटचे वाटप

वडवणी दि.१३(प्रतिनिधी) कोरोना विषाणूमुळे न्यायालयीन कामकाज ही तीन महिन्यांपासून बंद होते. तरी यामध्ये वकील बांधवांना मदत म्हणून बार कौन्सिल महाराष्ट्र व गोवा यांच्या वतीने वडवणी वकील संघातील वकील बांधवांना दोन वेळेस किराणा किटचे वाटप करण्यात आले आहे.                     देशात व राज्यात कोरोना विषाणूमुळे मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन करण्यात आलेले असून यामध्ये सर्वच क्षेत्रातील उद्योग, व्यवसाय यासह न्यायालयीन कामकाज ही तीन महिन्यांपासून बंद होते. त्यामुळे वकील बांधवांना देखिल आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत होता. यामध्ये विशेष ज्युनिअर वकीलांवर मोठे संकट आलेले आहे. या संकटाच्या काळात वकीलांना आर्थिक व काही ना काही आधार व मदत करावी अशी मागणी देशासह राज्यातील वकील संघाकडून करण्यात येत होती. तरी या मागणीची वकीलांची संघटना असणारी बार कौन्सिल महाराष्ट्र व गोवा यांनी दखल घेतली यामध्ये वडवणी वकील संघातील वकील बांधवांना दोन वेळेस किराणा किटचे वाटप करण्यात आले आहे. तरी यासाठी वडवणी वकील संघाचे अध्यक्ष अॅड.ताजुद्दीन शेख यांनी बार कौन्सिल महाराष्ट्र व गोवाचे पदाधिकारी, सदस्य यांच्याकडे पाठपुरावा केला. या संकटाच्या काळात वकीलांसाठी बार कौन्सिल महाराष्ट्र व गोवा यांनी हा सामाजिक उपक्रम राबविला आहे.