बीड

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

13 जून:  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरी उपस्थित होते. मुंबईत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात ही भेट झाली. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई सुद्धा उपस्थित होते. या बैठकीत “निसर्ग” चक्रिवादळ आपत्ती संदर्भात चर्चा होणार असल्याची माहीती मिळतेय. पण त्याच बरोबर राजकिय विषयांवरही चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोनाशी लढाई सुरू असतानाच आरोप-प्रत्यारोपांनाही सुरूवात झाली आहे. तर काँग्रेसने ठाकरे सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे फडणवीस आणि ठाकरे यांच्या भेटीकडे सगळ्यांचं लक्षं लागलं आहे.

फडणवीसांनी नुकताच कोकणचा दौरा केला होता. चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली होती. त्यानंतर  लोकांना मदत मिळावी म्हणून ही भेट असल्याचं सांगितलं जात आहे.