बीड

शिवसेनेच्या रक्तदान शिबीरात 40 कोविड योध्दांनी केले रक्तदान

माजलगाव ( प्रतिनिधी ) : तालुका शिवसेनेच्या वतीने  मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे  यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे, शिवसेना समन्वयक विश्वनाथ नेरुरकर, संपर्क प्रमुख आनंद जाधव, सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब आंबुरे, जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांच्या सूचनेवरून  सोशल डिस्टंस व सर्व नियम पाळून  रक्तदान शिबिर आयोजित करावीत असे आदेशित केल्यामुळे तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन दि.१३ जून शनिवार रोजी ग्रामीण रूग्णालय माजलगाव येथे करण्यात आले होते, या रक्तदान शिबिरात शिवसैनिक व नागरीकांपैकी 40 कोविड योध्दांनी सहभाग घेतला.   

या रक्तदान शिबीराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष अशोकराव होके पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामीण रूग्णालय अधीक्षक डॉ.सुरेश साबळे, डॉ.गजान्न रूद्रवार, तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव, माजी उपनगराध्यक्ष तुकाराम बापु येवले, सुनील खंडागळे, उपतालुकाप्रमुख अतुल उगले, नामदेव सोजे, शरद शिंदे, शिवसेना सचिव पप्पू धरपडे, विठ्ठल जाधव, गौतम वैराळे, संभाजी पास्टे, शिवाजी बोचरे, दिंगाबर सोळंके,अमोल डाके, शिवमुर्ती कुंभार,राम मुळे,शुभम डाके, खळेकर मामा, रुपेश घोडके,सुरेश पास्टे यांच्यासह महाराष्ट्र राज्य रक्तसंक्रमण रक्तपेढीचे कर्मचारी व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.    महाराष्ट्रात कोरोना साथरोगाची लागण मोठ्याप्रमाणावर पसरत असून यामध्ये मदतकार्य म्हणून शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.40 कोविड योध्दां रक्तदात्यांनी शिबीरात रक्तदान केले. रक्तदान शिबीराच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील शिवसैनिकांनी प्रयत्न केले.