तहसीलदार प्रशांत जाधवरांच्या जीवघेण्या हल्ल्या प्रकरणी एक जणास अटक
गेवराई , दि. १३:- गेवराईचे तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या कारवर वाळूचे टिप्पर पाठीमागून धडकून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न तीन दिवसापूर्वी गेवराई तालुक्यातील गढी गावाजवळ घडला.या प्रकरणी शुक्रवारी रात्री एक जणास पोलिसांनी अटक केली आहे.त्यास १५ जुन पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.या प्रकरण आणखी कोण कोण आहे व कुणाचा हात आहे याचा पोलिस शोध घेत असुन त्या दिशेने गेवराई पोलिस तपास करत आसल्याचे दिसून येत आहे.दरम्यान गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी पाञातून अध्यापही छुप्या मार्गाने काही प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरुच आसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे गेवराई तालुक्यात अवैध वाळू उपसा प्रकरणी आजवर शोकडो कारवाया झाल्या व गंभीर घटना देखील घडल्या आहेत,माञ छुप्या पद्धतीने माफिया अवैध वाळू उपसा आपपल्या परीने करतच आले आहे.परिणामी हा उपसा बंद होत नसल्याचे दिसून येत नाही.
गेवराईचे तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या कारवर पाठीमागून वाळूचा हयवा टिप्पर घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला गेला.ही घटना गेवराई तालुक्यातील गढी गावाजवळ गुरुवारी राञी घडला आहे.या प्रकरणी गेवराईचे तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या फिर्यादीवरुन गेवराई पोलिस ठाण्यात हनुमंत शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुक्रवारी रात्री गेवराई पोलिसांनी डिंगाबर गायकवाड या चालकास अटक केली असुन त्यास १५ जुन पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.तर हनुमंत शिंदे हे अध्यापही फरार आहे.आता ह्या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि राजाराम तडवी व पोलिस नाईक नवनाथ गोरे हे करत आहे.ह्या प्रकरणात आणखी कोण कोण आहे याचा तपास देखील पोलिस करत आसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी पाञातून अवैध वाळू उपसा प्रकरणी शोकडो कारवाया महसूल प्रशासनाने केल्या आहेत.तसेच अनेक गंभीर घटना देखील घडल्याचे संपूर्ण गेवराई तालुक्यातील नागरिकांनी पाहिले आहे.माञ वाळू माफिया अवैध वाळू उपसा करण्यासाठी कुणाचीही भिती न बाळगता आपला हा व्यवसाय सुरूच ठेवत आहे.तीन दिवसापूर्वी चक्क तहसीलदार प्रशांत जाधवर यांना याच प्रकरणातून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे आता गेवराई तालुकाक्यातील अवैध वाळू उपसा बंद होईल असे वाटले होते,माञ चोरुन लपून व छुप्या पद्धतीने हा वाळू उपसा गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी पाञातून विविध ठिकाणाहून काही प्रमाणात सुरुच आसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे गेवराई तालुक्यातील अवैध वाळू उपसा बीड जिल्हा प्रशासन व गेवराई प्रशासन आता कशा पद्धतीने कायमस्वरूपी बंद करतील याकडे गोदावरी नदी काठच्या गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
-कैलास हादगुले