बीड

दिव्यांगांना बदामराव पंडितांच्या हस्ते किराणा वाटप!

गेवराई , दि.13 :- गेवराई तालुक्यातील मादळमोही ग्रामपंचायती अंतर्गतच्या वतीने शिवसेना जि.प.सदस्य बप्पासाहेब तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, दिनांक १३ जून रोजी शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते गावातील दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक किराणा व धान्याचे वाटप करण्यात आले आहे.
मादळमोही ग्राम पंचायतीच्या वतीने शिवसेना जि.प.सदस्य बप्पासाहेब तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील ग्रामस्थांना सॅनिटायजर आणि मास्कचे वाटप केल्यानंतर,दिनांक १३ जून रोजी शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सर्व दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक किराणा व धान्याचे वाटप करण्यात आले आहे.याप्रसंगी जि.प.सदस्य बप्पासाहेब तळेकर,माजी सभापती पंढरीनाथ लगड,रामजी भुजबळ, सरपंच खाजाभाई पठाण,बापुराव राऊत,कृष्णाजी भोपळे,डॉ.शहाजी शेळके,शेख गणीभाई,सर्जेराव रीचोडे,शेख सिराज,वसंत वारंगे,भाई अशोक तळेकर,गणेश पवार,रमेश तळेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी सहकार्य केले.यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री बदामराव पंडित म्हणाले की,मादळमोही ग्रामपंचायत लोकांच्या हितासाठी व आरोग्यासाठी चांगले काम करत आहे.कोरोना सारख्या विषाणू विरोधात लढा देताना मादळमोही ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंच व सदस्यांनी जीवनावश्यक वस्तूसोबतच सॅनिटायजर व मास्कचे वाटप करून गावकऱ्यांची काळजी घेतली आहे. गावकऱ्यांनी आरोग्य विभाग व सरकारने सांगितलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन केले.
-कैलास हादगुले