जामखेड- जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत कोसळली
जामखेड- प्रतिनिधी (दि 13)
जामखेड शहरातील सर्वात मोठी विद्यार्थी संख्या आसलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले या शाळेची इमारतची दि १० जून २०२० रोजी झालेल्या पावसामध्ये मागिल बाजुच्या भिंतीचा भाग मध्यरात्री च्या सुमारास अचानक कोसळला सध्या लॉकडाऊन व मुलांना सुट्या आसल्याने शाळा बंद होती त्यामुळे सुदैवाने कोणतीही ही जीवित हानी झाली नाही. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले या शाळेचा एकूण पट ४११ इतका असून एकूण १४ तुकड्या आहेत. सध्या मराठी मुले शाळेच्या १८ खोल्या असून सर्वच्या सर्व खोल्या धोकादायक स्थितीत आहेत. या संपूर्ण इमारतीचे निर्लेखन मागील वर्षी मंजूर केले गेले आहे. परंतु नवीन इमारती अभावी सर्व विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव याच इमारतीत बसावे लागते.
मागील वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुलींची या शाळेची इमारत वादळी वाऱ्याने पडझड झाली होती. या ठीकाणी त्यामुळे इमारत निर्लेखन करून पाडण्यात आली. या शाळेतील देखील ३७० विद्यार्थिनींना देखील दुपारच्या सत्रात याच धोकादायक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुलांच्या इमारतीत बसवत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुली यांच्या नवीन इमारती संबंधी मागील वर्षी माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे गेले वर्षभर पाठपुरावा करण्यात आला होता त्यांनी या शाळेच्या वर्ग खोल्यांच्या पन्नास लक्ष निधी जिल्हा नियोजन मधून मंजूर केल्या बाबतचे घोषित केले होते. परंतु त्याबाबतही मागील वर्षी कुठलीच कारवाई झाली नसल्याचे नीधी उपलब्ध होऊ शकला नाही.
निवडणुका झाल्या नंतर नवीन विद्यमान आमदार रोहित पवार यांनीही शाळेच्या परिसरात भेट देऊन शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्याचे कबूल केले होते. परंतु त्यांच्याकडेही वेळोवेळी पाठपुरावा केला अद्याप निर्णय झालेला नाही
येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये जर इमारतीचा प्रश्न सुटला नाही तर अध्यक्ष अशोक यादव व उपाध्यक्ष नानासाहेब मोरे विजय लोळगे नितीन टेकाळे हे तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहेत. तसेच हे करूनही जर लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर शाळेतील सर्व मुले व मुली यांचे प्रवेश अन्य शाळेत स्थलांतर करून दोन्ही शाळा बंद करून शासनाचा निषेध नोंदविण्यात येणार आहे असा पवित्रा शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी घेतला आहे.
शाळेच्या इमारतीच्या प्रश्न अद्याप सुटलेला नाही. मागील वर्षी प्रशासनाने मुलींच्या शाळेची बसण्याची तात्पुरती सोय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले यांच्या इमारतीत केली. परंतु ही इमारत धोकादायक असल्याने व कोणत्याही क्षणी ती इमारत ढासळू शकते अशी स्थिती असल्याने या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना आता शाळा सुरू झाल्यावर कोठे बसवायचे हा प्रश्न शाळेसमोर उपस्थित झाला आहे. जर कोणतीही दुर्घटना झाली आणि यामध्ये मुलांच्या जीवाला काही बरेवाईट झाल्यास याला जबाबदार कोण आहे सदर प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर, यांना निवेदन देण्यात आले आहेचौकट शहरातील दानशूर व्यक्तींनी या शाळेला पाच एकर जमीन दिली होती यातील आडीच एकर जागेचा वाद न्यायालयात सुरू आहे तर आडीच एकर जागेवर ही शाळा उभी राहिली आहे शाळेची इमारत जुनी झाली आहे त्यामुळे सर्व शाळा खोल्या पाडून नवीन इमारत उभी करणे आवश्यक आहे लोकप्रतिनिधी अनेक वेळा निधी मंजूर केला परंतु आज पर्यंत कारवाई काहीच झाली नाही.