बीड जिल्ह्यासाठी विमा कंपनीची नियुक्त,फळ पीक विमा भरण्यास सुरूवात; शेतकर्यांनी लाभ घ्यावा
बीड जिल्ह्यासाठी विमा कंपनीची नियुक्त, आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या मागणीला यश
फळ पीक विमा भरण्यास सुरूवात; शेतकर्यांनी लाभ घ्यावा
बीड (प्रतिनिधी):- जिल्ह्यात रब्बीच्या हंगामात कोणत्यास विमा कंपनीने निविदा प्रक्रियेत भाग घेतला नसल्याने शेतकर्यांना विमा भरता आलेला नाही. प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून शेतकरी वंचित राहिले. या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून शेतकर्यांच्या पीकांना विमा संरक्षण मिळावे अशी मागणी सातत्याने आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, मंत्री जयंत पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली होती. आ.संदिप भैय्यांच्या मागणीला यश आले असून बीड जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड या कंपनीची विमा सुरू करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी पशु संवर्धन दुग्ध विभाग व मत्स्य विभागाने 12 जून रोजी निर्गमित केला आहे. फळ पीक विमा भरण्यास सुरूवात झाली असून शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्याकडून करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यासह इतर दहा जिल्ह्यांकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये कोणत्याच विमा कंपनीने भाग न घेतल्याने रब्बी हंगाम 2019-20 मध्ये कोणत्याच शेतकर्याला विमा भरता आला नाही. खरीप हंगाम 2020 मध्ये शेतकर्यांच्या पीकांना, फळ बागांना विमा संरक्षण मिळावे अशी मागणी सातत्याने आ.संदिप भैय्या क्षीरसागर करत होते. शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा सुरू होता. या मागणीच्या अनुषंगाने दि.5.12.2019 रोजी कृषी मंत्री दादाजी भुसे यांना व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र देवून बीड जिल्ह्यासाठी विमा कंपीनीची नियुक्ती करावी अशी मागणी केली होती. यावर कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय क्र.प्रपिवियो-2019/प्र.क्र.184/11-ए,दि.30 जानेवारी 2020 नुसार मंत्री समिती गठीत करण्यात आलेली आहे असे लेखी पत्र कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आ.संदिप क्षीरसागर यांनी 18 मार्च 2020 रोजी दिलेले आहे. त्यानंतर आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी पीक विम्या संदर्भातील मंत्री उप समितीतील सदस्य मंत्री जयंती पाटील यांच्याकडे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे याबाबतचा पाठपुरावा केला. तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनाही पत्राद्वारे विनंती केली. आता बीड जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा लिमिटेड, मुंबई या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंपनीचे क्षेत्रीय कार्यालय टॉप एक्चेंज टॉवर्स, 20 वा मजला, दलाल स्ट्रिट, पोर्ट मुंबई 400023 टोल फ्री क्रं.1800116515, दुरध्वनी क्र.02261710912, ई-मेल [email protected] तरी जिल्ह्यातील शेतकर्यांनी फळ पीक विम्यासाठी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्याकडून करण्यात आले आहे.