लिंबागणेश,पाली सर्कल मध्ये पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा
आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या महसूल प्रशासनास सूचना
बीड, प्रतिनिधी
शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने,वादळी वाऱ्यात लिंबागणेश,पाली सर्कल मध्ये मोठ्या प्रमाणात ,राहत्या घराची पडझड ,नव्याने लावलेली पिके कापूस व शेत जमिनी याचे नुकसान झाले आहे,शेतकऱ्यांच्या फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत,विजेचे पोल पडले असून यांची स्थानिक शेतकऱ्यांना कडून महिती घेत आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावते असे आदेश महसूल प्रशासनास दिले आहेत.
बीड तालुक्यातील अनेक ठिकाणी काल झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.लिंबागणेश ,पाली सर्कल मध्ये तासभर मुसळधार पावसाने वारकाच्या नदिला मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाल्याने पुर सदृश स्थिती निर्माण होऊन शेतीला तळ्याचे स्वरुप आले होते.बांधबंदिस्ती फुटुन जाऊन शेतक-यांचे शेतातील पेरलेल्या बि-बियाण्यासह शेतातील माती वाहुन गेली आहे, वरील पाणी नदिला मिसळल्यामुळे पोखरवाडा नदिला मोठ्या प्रमाणावर पुर आलाआहे ,जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.यावर आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांशी फोनवर चर्चा केल्यानंतर पंचनामे करण्याचे आदेश बीड तहसीलदार यांना दिले आहेत. या नुकसानीची माहिती तात्काळ तलाठी, ग्रामसेवक सरपंच यांनी वरिष्ठ कार्यालयास द्यावी ही असेही सांगितले आहे.
पेरणी केले,वाहून गेली आ. संदीप भैय्या कडे शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा !
लिंबागणेश परिसरात तासभर झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील बांधबंदिस्तीची कामे पावसाने वाहुन गेली, नुसते पाणीच नाही तर शेतातील पेरणी केलेल्या रानातील, बि-बियाने ,खते आणि त्याचबरोबर माती सुद्धा वाहुन गेली आशा व्यथा शेतकरी बांधवानी फोन वरून व्यक्त करतात महसुलाची यंत्रणा तात्काळ पंचनामे करण्यासाठी आ संदीप भैय्या क्षीरसागर यांनी पाठवली आहे.