मुसळधार पावसामुळे बामदळेवस्तीचे प्रचंड नुकसान
पाटोदा दि. १२ (प्रतिनिधी )
गेली तीन दिवस मृग नक्षत्रा मध्ये चांगला पाऊस पडत आहे.शेतकरीवर्ग खुष आहे.बऱ्याच साला नंतर पाऊस हा मृग नक्षत्रात पडला आहे त्यामुळे पेरण्या वेळेवर होतील या आनंदात शेतकरी होता.परंतु दिनांक १२ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पाऊसामुळे अख्खी बामदळे वस्ती जलमय झाली होती.
विशेष महिती अशी की पाटोदा मांजरसुंबा रस्त्याचे काम चालु आहे.काम जवळपास पूर्ण होत आले आहे .परंतु बामदळेवस्ती जवळ रस्त्याच्या बाजुने पाणी जाण्यासाठी नालीचे काम झालेले
नाही. मोठा पाऊस पडल्यामुळे वाहत येणारे सर्व पाणी बामदळेवस्ती आले त्यामुळे आनेकांच्या शेतीचे नुकसान झाले.तसेच बामदळेवस्ती वरील काही घरामध्ये पाणी शिरल्यामुळे घरतील साहित्याचे नुकसान झाले.
पाटोदा तहसीलदार व तलाठी यांनी बामदळेस्ती येथील सर्व परिस्थितीची पाहणी करून पाटोदा मांजरसुंबा रस्त्याच्या बाजुने नाली करण्यासाठी संबंधीत गुत्तेदाराल सूचना करण्यात यावी असे आवाहन बामदळेवस्ती येथील नागरिकांनी केले आहे.