कळंब-रोटरी क्लब सिटी तर्फे आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वितरण
कळंब:/ रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी मार्फत कळंब शहरामध्ये आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या रोगप्रतिकार शक्ती वर्धक आर्सेनिक अल्बम -३० या गोळ्यांचे वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. याची सुरुवात पुनर्वसन सावरगाव या भागापासून करण्यात आली. पुनर्वसन सावरगाव येथील मारुती मंदिर येथे पार पडलेल्या उदघाटन प्रसंगी कळंब शहराच्या नगराध्यक्षा सौ. सुवर्णा मुंडे , उपनगराध्यक्ष संजय मुंदडा , नगरसेवक श्रीधर भवर,
शकील काझी, अॅड. दत्ता पवार रोटरी क्लब चे सचिव डॉ. प्रा. चौधरी, रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी चे नूतन अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी व नूतन सचिव डॉ. सचिन पवार हे उपस्थित होते.
या गोळ्या वाटप करत असताना स्वतः सर्व रोटरी सदस्य आज घरोघरी जाऊन घरातील लोकांची संख्या विचारुन त्या पद्धतीने त्यांना गोळ्या वाटप करून त्या कशा घ्यावयाच्या व औषधी घेताना काय पथ्य पाळावीत याची माहिती सांगून एक माहितीपत्रक देत आहेत व या गोळ्या कमीत कमी 3 डोस घेण्याचे आवाहन करत आहेत.
या उपक्रमासाठी डॉ. अभिजित जाधवर, डॉ. रमेश जाधवर, डॉ. सुनिल थळकरी, डॉ. रामकृष्ण लोंढे,डॉ. रुपेश कवडे, . सुशीलकुमार तिर्थकर, संजय देवडा, करसन पटेल, लश्मीचंद कस्तुरकर , रवी नारकर, श्रीकांत कळंबकर यांच्या सह सर्व रोटेरियन्स उपस्थित होते.