मास्क न लावता फिरणार्यांकडून ९१ हजाराचा दंड वसूल!
केज:- कोरोनाच्या वाढत्या संक्रमणा पासून स्वतःचे आणि इतरांचे सरंक्षण करण्याकरिता मास्क अत्यावशक आहे. नव्हे मास्क हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे पण भरपूर निष्काळजी लोकं तोंडाला मास्क न लावताच समाजात वावरताना दिसतायेत.केज पोलिसांसह महसुल विभागाने सुद्धा विना मास्क लावता विनाकारण फिरनाऱ्यांकडून तब्ब्ल ९१ हजार ५०० रूपयाचा दंड वसुल केला आहे .शहरासह ग्रामीण भागातील नागरीकांनी नियमाचे पालन करावे नसता कारवाई केली जाईल असा इशारा तहसीलदार मेंडके यांनी दिला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने नियमावली ठरवून दिली आहे. मात्र या नियमाचे पालन होत नसल्याने जिल्ह्यात रूग्णांच्या संख्येन वाढ होवू लागली. मास्क वापरणे गरजेचे आहे असे असतांना नागरीक मात्र टाळाटाळ करत आहेत. मास्क न वापरणाऱ्यांना दंड आकारण्यात येत आहे
काळजी घ्या ...स्वस्थ रहा....मास्क वापरा!
- दैनिक झुंजारनेता लाईव्ह,बीड