अतिवृष्टीमुळे ऋषी एजन्सीचे लाखो रुपयांचे नुकसान
अंबाजोगाई (प्रतिनिधी) शहरातील जयवंतीनगर भागात असणाऱ्या ऋषी एजन्सी (हिरो शोरूम) च्या तळमजल्यावर अतिवृष्टी होऊन पावसाचे पाणी शिरल्याने ऋषी एजन्सीचे अंदाजे 27 ते 28 लाख रूपयांचे मोठे नुकसान झाले आहे.नुकसानीची माहिती मिळताच अंबाजोगाई तहसीलच्या वतीने मंडळ अधिकारी यांनी तात्काळ नुकसानीची पहाणी करून पंचनामा केला.
सन 2001 पासून अंबाजोगाई शरद लोमटे या तरूण उद्योजकांनी ऋषी एजन्सी (हिरो शोरूम) च्या माध्यमातून अंबाजोगाई व तालुक्यातील वाहनधारकांना दर्जेदार व तत्पर सेवा दिलेली आहे व ते सध्या ही देत आहेत.उद्योग व्यवसायात नांवलौकीक मिळवत असतानाच निसर्गाच्या लहरीपणामुळे क्षणांत होत्याचे नव्हते होवून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.गुरूवार,दिनांक 11 जून च्या रात्री 10 नंतर ते शनिवार दिनांक 12 जूनच्या पहाटे या कालावधीत अंबाजोगाई शहर व परिसरात अतिवृष्टी सारखा पाऊस झाला सुमारे 62 मी.ली.एवढा पाऊस झाल्याने प्रचंड प्रमाणात पाण्याचा प्रवाह तयार होऊन हे पाणी जयवंतीनगर भागातील ऋषी एजन्सिज हिरो शोरूमच्या तळ मजल्यात शिरले.सदर पाण्यामुळे शोरूमच्या तळमजल्यात ठेवलेल्या 15 नवीन दुचाकी गाड्या तसेच दुरूस्तीसाठी आलेल्या 15 दुचाकी गाड्या,8 रॅम्प,3 मोटार,नायट्रोजन मशीन,ऑइल मशीन,बॅटरी चार्जर,पार्ट वॉशिंग मशीन,कॉम्प्युटर,प्रिंटर,8 पाण्याच्या ट्रॉली, फर्निचर यांचे अंदाजे 28 ते 30 लाख रूपयांचे मोठे नुकसान झाले आहे.नुकसानीची माहिती मिळताच.मंडळ अधिकारी आर.बी.कुमटकर यांनी स्वतः फिरून शोरूमची पाहणी करून पंचनामा केला.यावेळी ऋषी एजन्सीज हिरो शोरूमच्या तळ मजल्यात सर्वञ मोठ्या प्रमाणावर जमा झालेले पाणी व चिखल दिसून आला.यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज येवू शकतो.