बीड

किल्लेधारुर शहर व परिसरात पाऊस

किल्लेधारुर दि.११(प्रतिनिधी) किल्लेधारुर शहर व परिसरात दि.११ रात्री मेघगर्जनेसह पाऊस झाला. शेतीतील कामे उरकून पावसाच्या प्रतिक्षेत असणारा बळीराजा यामुळे सुखावला आहे. किल्लेधारुर शहर व परिसरात शेतीची पेरणी पूर्व कामे उरकली आहेत. शेतक-यांनी खते व बियाणे तसेच पेरणीशी निगडीत इतर साहित्य आपापल्या घरी घेऊन शेतकरी आता पावसाच्या प्रतिक्षेत असताना गुरुवारी रात्री दहा वाजता मेघ गर्जना व विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. वृत्त लिही पर्यंत पाऊस सुरुच होता. या पावसामुळे पेरणीस मदत होणार असून बळीराजा मात्र सुखावला आहे.