बीड

वाळू माफियांच्या नांग्या ठेचू-जिल्हाधिकारी रेखावार

गेवराई :तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या स्विफ्ट गाडीला पाठीमागून धडक देऊन, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी दि.11 रोजी सायंकाळी गढी जवळ घडल्याने खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रेखावार तातडीने घटनास्थळी पोहोचले. तहसीलदार जाधवर बालंबाल अपघातात बचावले आहेत. वाळू माफियांच्या नांग्या ठेचू, धडा शिकाऊ,मात्र चांगल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जनतेने पाठिंबा द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.